सलग तिसऱ्या वर्षी 2कोटीहून अधिक किंमत; अ गटात पाच खेळाडू ठरले करोडपती
मुंबई, 31मे 2025: इराणच्या मोहम्मदरेझा शादलुईने सलग तिसऱ्या वर्षी 2 कोटीहून अधिक रक्कम मिळवताना प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावाचा सर्वोच्च मानकरी ठरण्याचा मान मिळवला. गेल्या मोसमातील मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर हा मान मिळवणाऱ्या शादलुईला गुजरात जायंटस संघाने 2.23कोटी रुपयांना खरेदी केले. सलग तिसऱ्या वर्षी हा मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
देवांक दलाल हा 2कोटी हून अधिक रक्कम मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला. गेल्या मोसमात सर्वोत्तम चढाई पटू ठरलेल्या देवांकला बेंगाल वॉरियर्स संघाने 2.205कोटी रुपयांना खरेदी केले. पीकेएल इतिहासातील तो पाचव्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
पीकेएल 12व्या मोसमाच्या लिलावात फायनल बीड मॅच(एफबीएम) हा नियम लक्षवेधी ठरला. या नियमानुसार कोणत्याही संघाला त्यांनी रिलीज केलेला खेळाडू एक किंवा दोन मोसमासाठी त्याच्या अंतिम लिलाव रकमेला पुन्हा खरेदी करता येणार आहे. या नियमाचा वापर करून दबंग दिल्ली के. सी. संघाने आपला स्टार चढाई पटू आशू मलिकला पुढच्या दोन मोसमांसाठी 1.90कोटी रुपयांना पुन्हा खरेदी केले.
अ गटातील सर्वाधिक किंमत मिळालेल्या अन्य खेळाडूंमध्ये तमिळ थलाइवाज संघाने अर्जुन देशवाल याला 1.405कोटी रुपयांना खरेदी केले. तर, बेंगळुरू बुल्स संघाने योगेश दहियाला 1.125कोटी रुपयांना खरेदी केले.
पीकेएल च्या 12व्या मोसमासाठी झालेल्या लिलावामुळे खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी त्याला कोट्यवधी रुपये मिळवून देण्यास कशी कारणीभूत ठरते हे सिद्ध झाले आहे. शादलुई व देवांक यांना दोन कोटी हून अधिक रक्कम मिळाली. तर, एकूण पाच खेळाडू कोट्यधीश झाले. नव्या एफबीएम नियमामुळे पटना पायरेटस आणि दबंग दिल्ली संघाना चांगले खेळाडू 1कोटी हून अधिक रकमेला खरेदी करावे लागले. अ गटातील या चुरशीच्या लिलावामुळे पीकेएल च्या 12व्या मोसमासाठी अन्य खेळाडू निवडून आपले संघ उत्तम रित्या तयार करण्याची संधी सर्व फ्रँचायझीना मिळणार आहे, असे मशाल स्पोर्टसचे व्यवसाय प्रमुख व पीकेएलचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
गट अ:
मोहम्मदरेझा शादलुई(2.23कोटी, गुजरात जायंटस);
फझल अत्राचली(30लाख, दबंग दिल्ली के. सी);
पवन सेहरावत (59.5लाख, तमिळ थलाइवाज);
भरत हुडा (81लाख, तेलगू टायटन्स);
विजय मलिक(51.5लाख, तेलगू टायटन्स);
शुभम शिंदे(80लाख, तेलगू टायटन्स);
अंकुश(30लाख, बेंगळुरू बुल्स);
दिपक राजेंदरसिंग(86लाख, पटना पायरेटस);
योगेश दहिया(1.125कोटी, बेंगळुरू बुल्स);
आशू मलिक(1.90कोटी, दबंग दिल्ली के. सी);
अर्जुन देशवाल(1.405कोटी, तमिळ थलाइवाज);
देवांक दलाल (2.205कोटी, बेंगाल वॉरियर्स)