उत्तर भारतातील पर्यटन क्षेत्रात ‘ज़ाना’च्या आलिशान आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या अनुभवाला नवा आयाम
एस्पायर हॉस्पिटॅलिटी लिमिटेडने देहरादूनमध्ये आपल्या नवीन ‘ज़ाना रिसॉर्ट’च्या कराराची घोषणा केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सुरू होणारे हे रिसॉर्ट प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या जवळ असणार आहे. निसर्गातून प्रेरित डिझाईन आणि ‘सोलफुल लक्झरी’चा संगम असलेले हे ठिकाण उत्तर भारतातील सर्वात आकर्षक सुट्टीच्या स्थळांपैकी एक ठरेल. ७ एकर हिरवळीत वसलेले हे आलिशान रिसॉर्ट ५० सुंदर कॉटेजसह शांत, आरामदायी आणि निसर्गाशी जवळीक साधणारा अनुभव देईल. काही कॉटेजमध्ये खासगी प्लंज पूलची सुविधाही असेल. आधुनिक सोयी आणि निसर्गाचा सुसंवाद यामुळे प्रत्येक पाहुण्याला सौंदर्य, आराम आणि शांततेचा अनोखा संगम अनुभवायला मिळेल.
या रिसॉर्टमध्ये ज़ानाचा प्रसिद्ध ‘मेफेअर रेस्टॉरंट’ असेल, जिथे खुले वातावरणात बसून जेवणाचा आनंद घेता येईल. तसेच एक आकर्षक बार आणि सुमारे २०,००० चौरस फुटांचा इनडोअर आणि आउटडोअर बँक्वेट स्पेस असेल – जे डेस्टिनेशन वेडिंग्स, सामाजिक कार्यक्रम आणि कॉर्पोरेट इव्हेंटसाठी परिपूर्ण ठरेल. याशिवाय स्पा, फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र आणि गेमिंग आर्केड यांसारख्या सुविधा कुटुंब, जोडपी आणि मित्रमंडळींसाठी एक परिपूर्ण सुट्टीचा अनुभव निर्माण करतील.
या प्रसंगी एस्पायर हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे सीईओ आणि एमडी श्री. अखिल अरोरा म्हणाले, “देहरादूनमधील हे नवीन ज़ाना रिसॉर्ट आमच्या वाढत्या हॉटेल नेटवर्कसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. उत्तर भारतातील पर्यटन क्षेत्रात आमची उपस्थिती अधिक मजबूत होईल. देहरादून नेहमीच प्रवाशांची आवडती जागा राहिली आहे, आणि हे रिसॉर्ट निसर्गाच्या सान्निध्यात एक अविस्मरणीय आणि आलिशान अनुभव देईल. आमचं उद्दिष्ट आहे – सुंदर डिझाईन, आधुनिक सोयी आणि उत्कृष्ट आदरातिथ्य यांचा समतोल साधणारी ठिकाणं उभारणं.” या नवीन प्रकल्पामुळे एस्पायर हॉस्पिटॅलिटी लिमिटेड उत्तर भारतात आपल्या प्रीमियम लीजर हॉटेल्सच्या नेटवर्कचा विस्तार वेगाने करत आहे. कंपनीचा उद्देश २०२६ पर्यंत ३० हॉटेल्स सुरु करण्याचा असून, देहरादूनमधील हा ‘ज़ाना रिसॉर्ट’त्यांच्या निसर्गाशी जोडलेल्या आलिशान अनुभव देण्याच्या वचनबद्धतेला अधिक बळकट करतो.


